बोगस मजूर प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. प्रवीण दरेकरांचा 50 हजाराच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी महाविकासआघाडी सरकारवर गंभीर आरोप केलेत. महाविकासआघाडीच्या मुजोर सरकारनं पुरावे नसतानाही दरेकरांना त्रास दिल्याचा आरोप केला. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यांना जमेल इतकंच करावं, जे जमतं नाही त्याचा प्रयत्न करु नका, असा टोलाही लगावला.
#PravinDarekar #PrasadLad #SakalNews #praveendarekar, #praveendarekarnews, #prasadlad, #prasadladreaction, #highcourt,