भाजपचे सातारा जिल्ह्यातले आमदार जयकुमार गोरे यांना सुप्रीम कोर्टातही झटका मिळालाय. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळलाय. जमिनीची खोटी कागदपत्रं बनवून फसवणूक केल्याचा आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टानं त्यांचा अर्ज फेटाळला आणि कोर्टापुढे शरण येऊन जामिनासाठी रितसर अर्ज करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे वडूजच्या न्यायालयात शरण येऊन आमदार गोरे यांना जामीन घ्यावा लागणार आहे.