उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची मालमत्ता जप्त केल्यानंतर भाजपा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली असून जर युती सरकारच्या काळात जावयाच्या प्रकरणामुळे जर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा राजीनामा बाळासाहेबांनी घेतला होता तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी राणे यांनी केली आहे.