काही दिवसापूर्वी मातोश्रीच्या बाहेर पुष्पा स्टाईलमुळे एक आजी चर्चेत आल्या होत्या. त्या मुख्यमंत्र्यांना समर्थन करण्यासाठी आणि नवनीत राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यासाठी मातोश्रीबाहेर जमल्या होत्या. नंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल कळताच या आजी भावूक झाल्या. राजीनामा दिला तरी आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया आजीने दिली.
#CM #UddhavThackeray #fireajji #shivsena #mumbai