एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून आरोप केले जात आहेत. यासाठी आज मुंबई भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. सरकारी अधिकऱ्यांना धमकी दिल्यामुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा,असे निवेदन देत त्यांनी राज्यपालांकडे मागणी केली आहे. या घटना त्त्वरीत थांबल्या नाहीत तर या संदर्भात आम्ही राष्ट्रपती, केद्रीय गुहमंत्री यांची भेट घेऊ आणि वेळ पडलीच तर आम्ही कोर्टातही जाऊ, अस इशारा भाजपच्या शिष्टमंडळाने दिला आहे.