Chinchwad Bypoll: अश्विनी जगतापांच्या प्रचाराला सुरुवात, संघाच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट
दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या सक्रिय झाल्या आहेत.
यानिमित्त त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसंच पदाधिकाऱ्यांनी आपल्याला पाठिंबा दर्शवल्याचं त्यांनी सांगितलं. लक्ष्मण जगताप यांचं अपूर्ण राहिलेले मेट्रो सिटीचं स्वप्न पूर्ण करणार, असा निर्धारही अश्विनी जगताप यांनी केला आहे.