२४ तारखेचा दिवस उजाडला आणि रशियानं युक्रेनवर हल्ला चढवला. आज रशिया-युक्रेन युद्धाला आठवडा पूर्ण झालाय. याच युद्धात आपण २ भारतीयांना गमावलंय. अनेक युक्रेनी नागरिक देशलढ्यात उतरलेत. कीव्ह, खारकिव्हसह इतर महत्वाच्या शहरांवर रशियाकडून अजूनही हल्ले सुरुच आहेत. मोठ्या प्रमाणात सैन्य, तोफगोळ्यासह युक्रेनच्या दिशेनं रशिया आगेकूच करतोय. पुतीन विरुद्ध झेलेन्स्कींच्या युद्धात शंभरहून अधिक देश युक्रेनच्या पाठीशी आहेत तर भारत, पाकिस्तान, बांगलादेशसह ३५ देश तटस्थ भूमिकेत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो नागरिकांना ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत मायदेशी आणलंय. युद्धाची झळ आता जरी युक्रेनियन्सना बसत असली तरी याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही होतोय. त्यामुळे युद्ध संपणं ही काळाची गरज आहे, इतकंच.
#russia #ukraine #russiaukrainewarupdates #russiaukrainewar #destructioninukraine