Russia Ukraine Crisis l रशिया-युक्रेन वादात आज काय नवीन?| Sakal Media
मागील २-३ आठवड्यांपासून जगभरातील मीडियात चर्चिला जाणारा विषय म्हणजे रशिया-युक्रेन वाद
या दोन देशांमधील वादामुळे जगावर युद्धाचं सावट असल्याची भीती व्यक्त होतेय.
त्यात आजची सकाळ म्हणजे युद्धाचे ढग आणखी गडद करणारी...
झालंय असं की रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील डोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन बंडखोर प्रांताना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली
या दोन्ही प्रांताची जवळपास ३० लाख लोकसंख्या आहे
या प्रांतातील बहुतांश लोक रशियन भाषा बोलतात
अनेकांकडे रशियाचा पासपोर्ट आहे
त्यामुळे पुतीन यांच्या या घोषणेनंतर जगभरातील मीडियामध्ये याच विषयाची चर्चा आहे
अमेरिकेकडून वारंवार पुतीन यांच्या निर्णयावर टीका केली जातेय
पुतीन यांचा निर्णय म्हणजे युद्धाला निमंत्रण देणारा असल्याचं बोललं जातंय
तर तिकडे पुतीन यांनी दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची घोषणा देताच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं तात्काळ बैठक बोलावली. यात रशियाच्या विस्तारवादी धोरणाचा अनेक राष्ट्रांनी विरोध केला आहे. तर, भारतानंही चर्चेतून मार्ग काढण्याची भूमिका मांडली आहे.
सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून रशिया-युक्रेन वादाचा मुद्दा शांतता आणि सुरक्षेला बाधा पोहोचू शकतो.
त्यामुळे दोन्ही देशांनी संयमानं विचार करावा.
हा मुद्दा फक्त चर्चेतून सोडवला जाऊ शकतो.
त्यासाठी दोन्ही देशांनी वेळ द्यावा
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही रशिया युद्धाच्या तयारीत असल्याचं म्हटलंय
- १९४५ नंतरचं मोठं युद्ध रशिया जगावर लादतंय. कारण फक्त युक्रेन नव्हे तर रशिया बेलारुसवरही हल्ला करण्याच्या तयारीत आहे. पण यात रशियाचीही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत जॉन्सन यांनी हा सावध इशारा दिला आहे.