भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या जागेवर असलेले १९ बंगले कुठे याची चौकशी करा अशी मागणी करत या संदर्भात रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री खरे की रश्मी ठाकरे खऱ्या याची स्पष्टता व्हायला हवी. रश्मी उद्धव ठाकरे यांना न्याय मिळवून द्यायचा आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.