‘उत्तर प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा यायला पाहिजे’, अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मांडली. मुलींना लग्नाचं अमिष दाखवून पळवून नेलं जातं. धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जाते. हे पाहता लव्ह जिहादचा कायदा आलाच पाहिजे, असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे. त्या पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होत्या.