जळगावात शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन केलं. पिक विमा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. प्रशासन शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असून अन्याय करत आहे असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. प्रशासनाकडून नुकसानाचे संपूर्ण पंचनामे झाले आहेत. मात्र तोकडी मदत करुन सरकारने आमची फसवणूक केली आहे. संकलित झालेले रक्त आम्ही मंत्रालयासह जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करणार असल्याचे यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. यावेळी अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. उत्स्फूर्तपण रक्तदान करत त्यांनी शासनाचा निषेध केला. दरम्यान यावेळी दिव्यांगांनाही आंदोलन केले. दिव्यांगांसोबत सुरु असलेली हेळसांड थांबवावी असं आवाहन त्यांनी केले.