बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावला आहे. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा प्रतिभा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असून यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून आहेत.