राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गुंडाच्या पत्नीकडून सत्कार केला गेला, यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. अटलजींच्या काळात भाजपा हा खूप जबाबदार पक्ष होता, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी विरोधी पक्षाला टोला लगावला आहे.