“भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा कोणताही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती”, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केलं. संजय राऊतांच्या या विधानानंतर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी “मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं?” असा सवाल उपस्थित केला आहे.
#KeshavUpadhye #SanjayRaut #BJP #Shivsena #ThackerayGovernment