बॉलिवूडमधील उत्तम मराठी बोलू शकणारे अनेक अमराठी कलाकार आहेत. त्यापैकी एक म्हणजे अक्षय कुमार. सध्या आगामी 'पॅडमॅन' चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामात व्यग्र असलेला अक्षय मराठीत गप्पा मारत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चित्रपटात त्याची सहकलाकार असणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिच्याशी अक्षय मराठीत गप्पा मारतो आहे अक्षयनेच त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'पॅडमॅन' चित्रपटाच्या प्रमोशसाठी सध्या हटके फंडे वापरले जात आहेत. त्यात चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेले किस्से हे कलाकार चाहत्यांना सांगतात. याच प्रमोशनचा भाग असलेला या व्हिडिओत राधिका आणि अक्षय मराठीत दिलखुलास गप्पा मारताना दिसत आहेत
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews