जीएसटी विभागाला मिळालेल्या टिप्सनुसार अंगाडियामार्फत गुजरातहून मुंबईला मागविलेली ८५ पाकिटे जीएसटी विभागाने तपासली असता त्यात ६९ कोटींचे हिरे, १६ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने आणि तीन कोटींची सोन्याची बिस्किटे आणि ४ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि ६० लाखांच्या परदेशी नोटा आढळल्या. दरम्यान, जप्त करण्यात आलेली सोन्याची बिस्किटे हा तस्करीचा भाग आहे की परदेशातून आणलेले आहेत, याचा जीएसटी विभाग आणि आयकर विभाग शोध घेत आहेत.गुजरातहून आलेल्या कुरियरमध्ये १०४२ बॅग होत्या. यातील केवळ २०० पार्सलधारकांकडेच जीएसटीशी संबंधित कागदपत्रे होती. तर ८४२ पार्सलधारकांकडे कागदपत्रेच नव्हती. त्यामुळे या पार्सलची चौकशी करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रे नसल्याने जीएसटी अधिकाऱ्यांनी पार्सल जप्त केले आहे. आम्ही कागदपत्रे दिल्यानंतर पार्सल सोडवून घेऊ.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews