योग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी मिळून पतंजलीचे प्रोडक्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले आहेत. आता ग्राहकांना पतंजलीचे प्रोडक्ट अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, ग्रोफर्स आणि बिगबास्केटसह इतर ऑनलाइन पोर्टलवरून विकत घेता येणार आहेत. या शिवाय पतंजलीचे प्रोडक्ट शॉपक्लूज व नेटमेड्स वरही मिळणार आहेत. योग गुरू बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सच्या अधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली. पतंजली कंपनी आता नॉट फॉर प्रॉफीटच्या दिशेने पुढे जाईल. कंपनी आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून संत्री विकत घेईल, असं रामदेव बाबा यांनी यावेळी म्हंटलं. सध्या लोक ऑनलाइन शॉपिंगला जास्त महत्त्व देतात. अशा लोकांसाठी पतंजलीचे प्रोडक्ट ऑनलाइन असणं चांगला उपक्रम असल्याचं, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी सांगितलं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews