Latest Bollywood Update | पाकिस्तानी अभिनेत्री Saba Qamar ने व्यक्त केले तिचे दुःख | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 1

'एक नई सुबह विद फराह' या शो मध्ये सबा कमरने अलीकडेच हजेरी लावली होती. यात ती चक्क रडत सांगत आहे की, पाकिस्तानी असण्याचे दुःख काय आहे. त्यात ती म्हणते, पाकिस्तान जिथे पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा केल्या जातात. पण जेव्हा आम्ही परदेशात जातो आणि ज्याप्रकारे आमची चेकींग केली जाते, ते मी सांगूच शकत नाही. जेव्हा एक एक गोष्ट चेक केली जाते तेव्हा खूप लाज वाटते. ''मला अजूनही आठवतेय, जेव्हा मी शूटींगसाठी टिबलिसीला गेले होते. माझ्यासोबत असलेले क्रू भारतीय होते. त्या सर्वांना सोडले आणि मला थांबवून ठेवण्यात आले. कारण माझा पासपोर्ट पाकिस्तानचा होता. माझे इन्वेस्टिगेशन झाले, मुलाखत झाली आणि त्यानंतर मला सोडण्यात आले. त्या दिवशी मला आपल्या इज्जतीची, पोजीशनची जाणीव झाली. आपले जगात काय स्थान आहे हे मला त्या दिवशी कळले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS