ह्याने IAS अधिकार्याला फसवले आणि करू लागला ब्लैकमेल
भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर एमएसआरडीसी च्या अधिकारी पदावरून सुट्टीवर पाठवण्यात आलेल्या आय.ए.एस. अधिकारी राधेश्याम मोपलवार ह्यांना ब्लैकमेल करून 10 कोटी रुपये मागणारे सतीश मांगले आणि त्यांची अभिनेत्री पत्नी श्रद्धा मांगले ला 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी मांगले दाम्पत्याला मोपलवार कडून पैस्यांचा पहिला हप्ता एक कोटि रुपये घेत असतांना डोंबिवलीत असलेल्या त्यांच्या घरातून अटक करण्यात आले. पोलिसांनी सांगितले कि राधेश्याम मोपलवार ह्यांचा पत्नीसोबत डिवोर्स ची केस कोर्टात चालू आहे, पत्नीवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी खाजगी गुप्तहेर सतीश मांगले ह्यांची मदत घेतली होती. ह्या गोष्टीचा फायदा घेवून मांगले ने मोपलवार ह्यांच्या भ्रष्टाचाराची ऑडियो रिकोर्डिंग केली होती. मांगले ने ऑडियो रिकोर्डिंग परत देण्याच्या बदल्यात 10 कोटी रुपयांची मागणी करत 7 कोटींमध्ये सौदा पक्का केला होता. ह्या त्रासाला कंटाळून मोपलवार ह्यांनी ठाणे पोलिसात तक्रार नोंदवली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews