लहानपणी आपल्यापैकी अनेक जण दिवसभर मैदानात खेळायचो. दंगा मस्ती करायचो. यामुळे आपण अनेकदा आई वडिलांचे धपाटे सुद्धा खाल्ले आहेत. परंतु फक्त गेम खेळून कोणी वर्षाला 80 कोटी कसे कमावू शकतो? होय हे सत्य आहे. 26 वर्षांच्या डॅन मिडलटन ने व्हिडीओ गेम खेळण्याचा आपला छंद जपला आणि याच छंदाचा त्याने पैसे कमावण्यासाठी वापर केला. फोर्ब्स च्या माहितीनुसार डॅनचे वार्षिक उत्पन्न हे 80 ते 90 कोटींच्या आसपास आहे. व्हिडीओ गेम चे रीव्हीव तो देतो. त्याच्या गेम्स रीव्हीव्स ना तरुणांची छान पसंती लाभली आहे. अनेक युट्युब्स व्हीव्ह्स हे लाखोंच्या घरात असतात. परंतु डॅनच्या बाबतीत व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या कोट्यावाधींच्या घरात असते. फोर्ब्स मासिकाने 2017 च्या श्रीमंत युट्यूब वरच्या यादीत त्याला स्थान दिले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews