विक्रीकर निरीक्षक परीक्षेत आपल्या जागेवर डमी उमेदवार बसवणा-या नांदेडच्या दोघांना अटक करण्यात आली आहे. संतोष हंपलवाड आणि विलास मोतेवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. MPSC भरती रॅकेटमधील सूत्रधार नांदेड येथील ग्रामसेवक अनंत कोलेवाड याच्या विरोधात पोलिसांनी अटक वॉरंट बजावले आहे. कोलेवाड २०१७ साली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झालाय. डमी उमेदवार बसवून तो ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पोलीसांचा संशय आहे. मुंबईत MPSC तर्फे घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेतील डमी उमेदवार रॅकेट प्रकरणी या अटक झाल्या असून राज्यभरात २००९ पासून सुरू असलेल्या भरती रॅकेटशी यांचा संबंध असल्याचा संशय आहे. नांदेड येथील धाडसी तरुण योगेश जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे या सर्व अटक झाल्या आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews