जालियनवालाबाबत ब्रिटिश सरकारने माफी मागायला हवी | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 0

‘सन 1919 मध्ये घडलेल्या जालियनवाला बाग येथील हत्याकांडाबाबत ब्रिटिश सरकारने माफी मागितली पाहिजे,’ असे वक्तव्य लंडनचे महापौर सादिक खान यांनी बुधवारी केले. ‘हे हत्याकांड कोणीही कधीही विसरू शकणार नाही,’ असे ते म्हणाले.खान मंग‍ळवारी अमृतसरमध्ये आले आहेत. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहिली. ‘जालियनवाला बागची भेट मन हेलावून टाकणारी होती. ब्रिटिश सरकारने आता माफी मागायची वेळ आली आहे. सन 1919 मध्ये बैसाखीच्या पूर्वसंध्येला झालेले हे हत्याकांड भारताच्या इतिहासातील कला अध्याय आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी सन 2013 मध्ये जालियनवाला बागला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनीही या हत्याकांडाचा निषेध करून, ‘ब्रिटिश इतिहासातील ही अतिशय लांच्छनास्पद घटना आहे,’ असे म्हटले होते. मात्र, याबाबत अधिकृतपणे माफी मागितली नव्हती. दरम्यान, खान यांनी अमृतसरमध्ये सुवर्णमंदिरालाही भेट दिली. तेथील लंगरमध्ये सहभागी होऊन पदार्थ कसे बनवले जातात, याची आस्थेवाइकपणे माहितीही घेतली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS