सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून रिकाम्या बाटल्या तेथेच टाकून देण्याच्या प्रकारामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली असून, गोवा सरकारने त्याची दखल घेत कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे. येत्या 15 दिवसात कायद्यात तरतूद करून त्याची पुढच्या महिन्यापासून कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.नवीन वर्षाचे स्वागत करण्या साठी आलेले पर्यटक दारुच्या दुकानां समोर आणि बीचवर दारु पिऊन बाटल्या तिकडचे टाकून जात असल्याचे आढळून आले होते. कळंगुट किनाऱ्यावर बियरच्या बाटल्या हातात घेऊन बीचवर जाणाऱ्या पर्यटकांना पोलिस रोखत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews