चारा घोटाळाप्रकरणी साडेतीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना तुरुंगात नवं काम मिळालं आहे. रांचीमधील बिरसा मुंडा तुरुंगात त्यांना माळी काम करावं लागणार आहे. मोबदला म्हणून त्यांना दररोज ९३ रुपये मिळणार आहेत लालूप्रसाद यांची हजारीबाग येथील तुरुंगात रवानगी करण्यात येईल. दरम्यान, तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर राष्ट्रीय जनता दल त्यांच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. लालूप्रसाद यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली असती तर, विशेष न्यायालयातच त्यांना जामीन मिळण्याची शक्यता होती. तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्याने आता जामिनासाठी उच्च न्यायालयात जावे लागणार आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews