ह्या बाबतीत ब्रिटिश सरकार ने माफी मागण्यास नकार दिला | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 5

अमृतसरच्या जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल माफी मागण्यास ब्रिटन सरकारने नकार दिला आहे. ही घटना लाजिरवाणी आणि अत्यंत निषेधार्ह असल्याचे मत मात्र पुन्हा एकदा नोंदवले आहे.
लंडनचे महापौर सादिक हे बुधवारी अमृतसर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जालियनवाला बागेतील शहीदांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये लिहिले की,१९१९ साली झालेल्या या नरसंहारप्रकरणी माफी मागण्याची वेळ आली आहे. यावर ब्रिटन सरकारच्या परराष्ट्र खात्याने गुरुवारी निवदेन जारी केले. त्यामध्ये परराष्ट्र खात्याने असे म्हटलंय की, ब्रिटनचे माजी पंतप्रधान 2013 साली हिंदुस्थान दौऱयावर असताना त्यांनीही जालियनवाला बाग ही अत्यंत लाजिरवाणी घटना असल्याची कबुली दिली होती. ही घटना कधी विसरता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. हे सत्य आहे की मृत व्यक्तींप्रति आम्हाला आदर आहे. ब्रिटिश सरकार या घटनेची निंदा करीत आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र खात्याने आताही जालीयनवाला बाग घटनेचा निषेध केला, परंतु माफी मागितलेली नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS