हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हिरो अशी शशी कपूर यांची ओळख होती. ते तरुणींच्या गळ्यातला ताईत बनले होते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. हॅडसम हिरो अशी त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख होती.शशी कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे तिसरे सुपुत्र. 18 मार्च 1938 साली कोलकतामध्ये त्यांचा जन्म झाला. मुंबईतल्या मांटुग्याच्या डॉन बॉस्को शाळेत शशी कपूर यांचे शिक्षण झाले. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे एक प्रसिद्ध अभिनेते होते. पृथ्वी थिएटर या वडिलांच्या थिएटर कंपनीमधूनच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पृथ्वी थिएटरच्या शकुंतला या नाटकाने त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर 1945 मध्ये के.एल.सहगल आणि सुरैय्या यांच्या तदबीर सिनेमात त्यांनी शशीराज नावाची भूमिका साकारली. त्यानंतर राज कपूर यांच्या आग आणि आवारा या सिनेमात शशी कपूर यांनी राज कपूर यांच्या बालपणाची भूमिका साकारली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews