Latest Bollywood News Update | Bollywood Singham करणार या अभिनेत्री सोबत रोमान्स | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 0

बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणजेच अभिनेता अजय देवगणने त्याचा मोर्चा कॉमेडी चित्रपटांकडे वळवला आहे. ‘गोलमाल अगेन’ या हॉरर कॉमेडीनंतर आता अजय एका रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री रकुल प्रीत मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फेम दिग्दर्शक लव रंजन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.रकुल प्रीत सिंह तिच्या आगामी ‘अय्यारी’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ‘अय्यारी’नंतर लव रंजनच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. रकुलने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून तिने ‘मिस इंडिया’चाही किताब जिंकला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS