बॉलिवूड मधील हिट जोडी दीपिका पदुकोण व रणवीर सिंग देखील लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र सध्या तरी हे दोघे साखरपुडा करणार आहेत. येत्या पाच जानेवारीला म्हणजेच दीपिकाच्या वाढदिवशीच श्रीलंकेतील कोलंबो येथे हे दोघे साखरपुडा करणार आहेत.नवीन वर्ष सुरू होण्याआधी एका जाहिरातीच्या शुटींगसाठी रणवीर कोलंबोला गेला होता. त्यानंतर दीपिका देखील बॉयफ्रेण्डसोबत थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोलंबोला गेली. तेथे त्या दोघांनी जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले. सध्या ते कोलंबोतच असून दीपिकाचा वाढदिवस साजरा करूनच ते भारतात परतणार आहेत. पण तेथे दीपिकाच्या वाढदिवशीच ते दोघे साखरपुडा करणार आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews