रोहिंग्या मुस्लिमांविरोधात लष्कराने सुरु केलेली कारवाई थांबवावी आणि त्यांना म्यानमारचे पूर्ण नागरिकत्वाचा हक्क देण्यात यावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाने केले आहे. रोहिंग्यांचा मुद्दा जगभरात गाजत असताना राष्ट्रसंघाने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरोधात तेथील लष्कराकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे तेथील रोहिंग्या वेगवेगळ्या देशात स्थलांतर करत आहेत. तसेच रोहिंग्यांनी भारतातही आश्रय घेतल्याचे समोर आले. रोहिंग्यांच्या या समस्येची दखल घेत संयुक्त राष्ट्रसंघाने रोहिंग्याविरोधातील लष्करी कारवाई थांबवावी आणि तेथील नागरिकांना म्यानमारचे नागरिकत्व देऊन पूर्ण अधिकार देण्यात यावे, असे म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांनी निर्वासित रोहिंग्यांच्या मुद्यावरुन कालच मोदी सरकारवर टीका केली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews