लहान मुलं कल्पना करण्यात खूपच हुशार असतात, आजी आजोबांकडून गोष्टी ऐकून कधी ते परीलोकांत हरवून जातात. तर कधी कोणत्या चांगल्या आणि खऱ्या मित्राची कल्पना करण्यात मग्न होतात, असा मित्र जो त्यांच्याशी भरपूर गप्पा मारेल आणि त्यांच्या कल्पनांमध्ये रंग भरेल. ओटॅगो विश्वविद्यालयाला आपल्या अध्ययनात सापडले की, बालकांमध्ये काल्पनिक दोस्त बनवण्याची क्षमता त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेशी सखोल प्रमाणात जोडलेली असते. जी बालके कल्पना लोकातील त्या मित्रांबरोबर जितक्या जास्तगप्पा मारतात ते त्या भाषेमध्ये जास्त प्रवीण होतात. विश्वविद्यालयातील प्रोफेसर अलेन रिज यांनी सांगितले कि बालकांमध्ये कल्पनाशीलता आणि त्यांची शिकण्याची प्रक्रिया यामधील संबंध शोधण्यासाठी संशोधनात 48 लहान मुले-मुलींना सामील केले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews