अब इन्हे दवा के साथ दुआ की भी जरूरत है’ असे डायलॉग आपण हिंदी चित्रपट किंवा मालिकांमधल्या डॉक्टरांच्या तोंडी अनेकदा ऐकले असतील. पण कधी प्रत्यक्षात एखाद्या डॉक्टरने रुग्णांना असे सल्ले देताना ऐकलंत का? असं फारच क्वचित ऐकलं असेल. सध्या औषधांबरोबर रुग्णांना मंत्राचे पठण करण्याच्या सल्ला देणाऱ्या डॉक्टरांची पावती सोशल मीडियावर खिल्लीचा विषय ठरला आहे.राजस्थानमधील भरतपूर येथील डॉक्टरांनी एका रुग्णाला औषधांसोबतच हनुमान चालिसा पठणाचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांचं नाव दिनेश शर्मा असल्याचं समजतं. एका सरकारी रुग्णालयात ते डॉक्टर असल्याचेही सांगण्यात येते. शेखर नावाचा रुग्ण पोटाच्या तक्रारीसांठी त्यांच्याकडे गेला असता त्यांनी काही औषधं त्यांना लिहून दिली होती. औषधांची यादी संपल्यानंतर तिच्याखाली हनुमान चालिसेचे पठणदेखील करावं असंही लिहिलं होतं.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews