‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या व्यासपीठावर राणी गेली होती. राणीने सलमानला लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. मुख्य म्हणजे लग्न न करताच तू बाबा हो, असे तिने त्याला सांगितले. सलमानची मुलं आपल्या मुलीसोबत म्हणजेच आदिरासोबत चांगली मैत्री करु शकतात, तिला साथ देऊ शकतात, तिच्यासोबत खेळू शकतात असे तिला वाटते. त्यामुळेच राणीने ‘दबंग खान’ला हा सल्ला दिला. सलमानने लग्न न करताच बाबा व्हावे, असे राणी खोडकरपणे म्हणाली खरं. पण, लग्नाविषयीच्या प्रश्नांनी इतरांप्रमाणेच तिनेही त्याच्या नाकी नऊ आणले. यावेळी एकेकाळी ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या जोडीचा तोच अंदाज आणि त्यांच्या मैत्रीच्या नात्याची निखळ बाजू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अनेकांनाच मदत करणारा हा ‘यारों का यार’ सलमान राणीचा सल्ला मनावर घेणार की येत्या काळात लग्न करुन संसार थाटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews