‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यापैकीच गाजलेली भूमिका म्हणजे कटप्पाची. सत्यराज यांनी साकारलेल्या कटप्पाच्या भूमिकेला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली होती. आगामी चित्रपटात ते एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. ‘हॉन्टेड रेडिओ रूम’ या तामिळ थरारपटात ते झळकणार आहेत. ‘कालाप्पदम’ या गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक वेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. उत्तम थरारपटांसाठी त्यांची ओळख आहे. या चित्रपटाबद्दल ते म्हणाले की, ‘एखाद्या चित्रपटाच्या यशासाठी त्यातील कास्टिंग तितकीच महत्त्वाची असते. जेव्हा सत्यराज यांनी भूमिकेला होकार दिला तेव्हाच मला माझे 50 टक्के काम पूर्ण झाल्यासारखे वाटले. माझ्या मते, त्यांच्याशिवाय दुसरे कोणीच ही भूमिका साकारू शकत नाही.’
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews