इंग्लंडमधील बर्कशायर भगातील, स्लॉघ शहरात राहणारी, हरनाम कौर ही मॉडेल सर्वसाधारण मुलींसारखीच आहे. मात्र तिचे एक खास वैशिष्ट्य सर्व जगात चर्चेचा विषय बनले आहे. हरनाम कौरला चक्क सहा इंच लांब दाढी आहे. पुरुषांप्रमाणे दाढी-मिशा असल्यामुळे या सौंदर्यवतीने ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये स्थान मिळवले आहे. संपूर्ण चेहर्यावर दाढी असणारी सर्वात तरुण मुलगी म्हणून गिनिज बुकमध्ये तिची नोंद करण्यात आली आहे. मानवी शरीरातील पेशींमधील संप्रेरकांमध्ये बदल होऊन तिला पुरुषांप्रमाणे दाढी-मिशा आल्या असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दाढी-मिशांमुळे हरनामला अनेकदा लोकांच्या टिंगलटवाळीचा सामना करावा लागला. पण या दाढी-मिशांमुळेच तिची एक वेगळी ओळख बनल्याचे ती मान्य करते. 2016 साली लंडनच्या फॅशन विकमध्ये सहभागी होणारी ती पहिली दाढीधारी मॉडेल ठरली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews