जगातील अजब - गजब बँक | World's Most Different Bank | दुनीया की अजब बैंक

Lokmat 2021-09-13

Views 38

जगातील अजब- गजब बँक | World's Most Different Bank

आधार कार्ड नोंदवताना बोटांचे ठसे देताना थोडं अवघडल्या सारखं असत. पण जगामध्ये अशीही एक बँक आहे जी बँक खातेधारकांकडून कर्ज देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र घेत नाही. मात्र, ही बँक फक्त इमर्जन्सी असल्यावरच कर्ज देते. कर्ज देतांना ही बँक फक्त तुमच्या हाताचे ठसे स्कॅन करून घेते. जपानच्या या अनोख्या बँकेचे नाव आहे ओगाकी क्योरित्सू बँक. या तंत्रज्ञानाचा वापर करून एका व्यक्तीला ११.२० लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देते.
तीन वर्षापूर्वी नियम बदलला २०११ मध्ये भूकंप आणि सुनामी दरम्यान जपानमध्ये मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. यादरम्यान लोकांनी घर तयार करण्यासाठी मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागला होता. कारण, नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांचे सर्व कागदपत्रे हरवली होती. या त्रासामुळे लोकांना बिझनेस सुरू करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. मात्र, कागदपत्रांअभावी कोणतीही बँक नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देत नव्हती. लोकांना आपली ओळख पटवून देण्यासाठी मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे जापानच्या ओगाकी क्योरित्सू बँकेने २०१२ पासून कर्जप्रक्रिया सुलभ केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS