कर्नाटक सरकारमधील मंत्री राेशन बेग यांनी सीमाभागातील मराठी लाेकप्रतिनिधींना ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास त्यांचे पद रद्द करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसेसवर आता ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिले जाणार, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी पुण्यात केली.रावते आणि डाॅ. दीपक सावंत हे बेळगावात गेले हाेते. मात्र कर्नाटक पाेलिसांनी त्यांना सीमेवरच अडवून परत पाठवले. या घटनेमुळे महाराष्ट्रात कर्नाटकविराेधात असंताेष व्यक्त हाेत अाहे.इतकेच नव्हे तर मुंबई, पुणे, ठाणे, काेल्हापूर बसस्थानकांवर अालेल्या कर्नाटकच्या बसेसही ‘जय महाराष्ट्र’ लिहून पाठवण्यात अाल्या हाेत्या..अनेक वादा बरोबर हा वाद ही काय दिशा घेईल हे तर येणारा कालच सांगेल
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews