Latest Political Update | AAP ला झटका, दिल्लीत होणार लवकरच 20 जागांसाठी निवडणुका | Lokmat Marathi

Lokmat 2021-09-13

Views 0

आपने आपल्या 21 आमदारांना संसदीय सचिवपद दिलं आहे. ही सर्व लाभाची पदं आहेत. त्यामुळे या आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी वकील प्रशांत पटेल यांनी मार्च 2015 मध्ये राष्ट्रपतींकडे याचिके द्वारे केली होती.यानंतर राष्ट्रपतींनी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवलं होतं. या प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाली असून आज अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. राष्ट्रपतींनी पाठवलेल्या याचिकेवर दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने आपलं उत्तर देताना, या 20 ही आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस केली होती. निवडणूक आयोगाच्या शिफारसीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवलं आहे.दरम्यान, राष्ट्रपतींनी जरी आपचे 20 आमदार अपात्र ठरवले, तरीही केजरीवाल सरकारवर फरक पडणार नाही. कारण, दिल्लीत 70 पैकी तब्बल 66 आमदार आपचे आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS