लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभर मोहीम सुरू करणाऱ्या महिलेला होणार अटक | Lokmat Marathi News

Lokmat 2021-09-13

Views 0

लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम फ्रान्समध्ये सुरू करणं एका पत्रकार महिलेला महागात पडलं आहे. या प्रकरणी एका व्यक्तीनं तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. तक्रारकर्त्यानं तिच्याकडं ५० हजार युरोंच्या नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे. सँड्रा म्युलर असं या पत्रकार महिलेचं नाव आहे. म्युलर हिनं गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला #balancetonporc असं लिहून एक ट्विट केलं होतं. वृत्तवाहिनीत तिच्यासोबत काम करणाऱ्या एरिक ब्रायन या सहकाऱ्यावर तिनं या ट्विटद्वारे काही आरोप केले होते. एरिकनं याबद्दल आपली जाहीर माफी मागितल्याचंही तिनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. तिच्या ट्विटनंतर एरिकनं एका वृत्तपत्रात लेख लिहून म्युलरचे आरोप मान्य केले होते. मात्र, आता घुमजाव करत त्यानं म्युलरवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS