अनेक महिन्यांपासून गुलदस्त्यात असलेला प्रश्न कि नारायण राणे ह्याचं काय होईल? त्यांची होडी तीरावर लागेल का? आधी शिवसेनेतून कॉंग्रेस मध्ये, मग तळ्यात मळ्यात अवस्था निर्माण झाल्याने महाराष्ट्र स्वाभिमान नावाने नवीन पक्ष त्यांनी सुरु केला. गेले अनेक महिने भा.ज.पा. च्या संपर्कात असलेले नारायण राणे पक्षातून आणि मित्रपक्ष शिवसेनेतून विरोध होत असल्यामुळे भा.ज.पा. च्या वेशीवर येवून थांबले होते. अखेर महाराष्ट्रात सत्तारूढ असलेल्या भा.ज.पा. मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल करणार आहे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची त्यात मंत्री म्हणून वर्णी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी सांगितले कि हिवाळी अधिवेशनाआधीच नारायण राणे एन.डी.ए. मध्ये सहभागी होतील. आणि लवकरच नारायण राणेंचा परिचित आक्रमक पवित्रा महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews