पाकिस्तानचा पुन्हा डाव | भारता विरुद्ध पाकिस्तान चे डावपेच.
पाकिस्तान त्यांच्या खुरपती कारव्यांसाठी अधिक प्रचलित आहे. परंतु त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला प्रतित्तर देण्यास भारत नेहमीच समर्थ आहे.
तब्बल २७ वर्षांनी पाकिस्तान सोडून भारतात दाखल झालेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हसन खान असे या व्यक्तीचे नाव असून तो पाकिस्तानी गुप्तहेर असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हसन खान यांना १९९० मध्ये एका बेकायदेशीर एजंटने पाकिस्तानात नेले होते. आपल्या आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी ते पाकिस्तानात गेले होते. तेव्हापासून ते पाकिस्तानमधील खरोडा गावात राहत होते. मात्र, सहा महिन्यांपूर्वी ते बेकायदेशीररित्या भारतात आले. हसन हे पाकिस्तानी गुप्तहेर असल्याची शंका भारतीय लष्करी यंत्रणेला होती. त्यानुसार त्यांचा शोध घेण्याचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरु होते. मात्र, यंत्रणेपासून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी हसन राजस्थानबरोबरच गुजरात आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी लपून बसले होते. अखेर त्यांना अटक करण्यात गुप्तहेर संघटनेला यश आले असून त्यांची पुढील चौकशी सुरु आहे.