नव्या CCTV चे झाले निर्माण पहा काय आहे विशेष | Latest CCTV Technology | लोकमत न्यूज़

Lokmat 2021-09-13

Views 25

एल्फिन्स्टनरोडस्थानकातील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेच्या पादचारी पुलांवरही क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होताच ती टिपून रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाला सतर्क करणारे वैशिष्टय़पूर्ण कॅमेरे (व्हिडीओ अँनेलिटिकल) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेची चाचणी प्रथम सीएसएमटी सारख्या गजबजलेल्या स्थानकावरील पादचारी पुलांवर घेण्यात येणार आहे. सध्या रेल्वेत कार्यरत असलेल्या कॅमेऱ्यांत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास दादर, कुर्ला, परळ, ठाणे आदी गर्दीच्या ठिकाणच्या कॅमेऱ्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत खूपच वाढली आहे. त्या तुलनेत गाडहे य़ांची संख्या, पादचारी पूल, फलाटाची लांबी-रुंदी वाढलेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांना गर्दीच्या वेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गर्दीमुळे पादचारी पुलांवरून उतरताना आणि चढताना तर बराच वेळ जातो. अशावेळी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेच्या पादचारी पुलावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही नसतात. त्यामुळे जवानांना तैनात करण्याबरोबरच गर्दी नियंत्रित करण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब रेल्वेकडून करण्यात येत आहे


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS