पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटबंदीचे फायदे सांगण्यासाठी भाजप मैदानात उतरली असताना दुसरीकडे काँग्रेसने नोटबंदीच्या निषेधार्थ आंदोलन सुरु केले आहे. नोटबंदीच्या वर्षपूर्तीच्या निषेधार्थ काँग्रेसने आज देशभरात 'काळा दिवस' पाळला आहे.
औरंगाबाद मधे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसने नोटबंदीच्या निषेधार्थ सामूहिक मुंडण आंदोलन केले आहे 20 कार्यकर्त्यांनी सामूहिक मूंडण करून मोदी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.
मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निषेधार्थ पंढरपुरात वर्षश्राद्ध व पिंडदान आंदोलन सुरू़ केले आहे
धुळ्या मधे नोटबंदीच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना काँग्रेसने श्रद्धांजली अर्पण केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews