पाकिस्तान मध्ये राहून भारतासाठी गुप्तहेरी केल्याचा आरोप लावून कुलभूषण जाधव ह्यांना पाकिस्तान ने कैद करून त्याला फाशी ची शिक्षा सुनावली होतो. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारने सातत्याने केलेला पथ्पुअरव आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे कुलभूषण जाधव प्रकरणात घेतलेली आडमुठी भूमिका पाकिस्तान ने काहीशी मवाळ केली आहे. पाकिस्तानने कारागृहात बंद असलेले कुलभूषण जाधव ह्यांना भेटण्याची परवानगी त्यांच्या पत्नीला दिली आहे. मानवतेच्या भावनेतून कुलभूषण जाधव ह्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. भारतातील निवृत्त अधिकारी असलेल्या ४६ वर्षीय जाधव ह्यांना मार्च २०१६ मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. ह्याबाबत भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी आंतराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला १३ डिसेंबर रोजी लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews