शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या मुलीचा आज साखरपुडा समारंभ पार पडला. त्यानिमित्ताने ग्रँड हयात हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवलेलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या दोन्ही विरोधी पक्षांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. फोटो सेशन नंतर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारून त्यांचं स्वागत केलं. हे दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. जे संजय राऊत रोज फडणवीस आणि भाजपच्या विरोधात भूमिका घेतात आणि महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. या दोनही नेत्यांची गळाभेट पाहून अनेकांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या....