राज्यात झालेल्या पावसानंतर शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी सोलापुरात आले. सोलापूर विमानतळावरून ते अक्कलकोटकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांसोबत कृषी मंत्री दादा भुसे, खासदार विनायक राऊत ही अक्कलकोट कडे रवाना झाले आहे. वाटेत ठाकरे यांनी बोरी नदीच्या पुलावरून सांगावी गावाची पाहणी केली. (व्हिडिओ - विश्वभूषण लिमये)