माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नुकसानग्रस्त पिकाची पाहणी | Live Marathi News |

Sakal 2021-04-28

Views 614

नरखेड : माजी उर्जा मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नरखेड तालुक्यात नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी 15 दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राज्य सरकारला केली. अन्यथा गावागावात जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जनावरांवर आलेल्या रोगांवर त्वरित लसीकरण करण्यात यावे. अतिवृष्टी, महापूर, किडीचा प्रादुर्भाव यामुळे झालेल्या सर्व पिकांच्या नुकसान भरपाईपोटी सरसकट प्रति हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे. महापुरात झालेल्या घरांच्या पडझडीकरिता अडीच लाख रुपयांच्या मदतीची मागणी त्यांनी केली आहे.
(व्हिडिओ – अतुल दंढारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS