पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली आहे. लोणावळा ते खोपोली एक्झिट असा 13.3 किलोमीटर चा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील दोन्ही बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुणे- मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची 20 ते 25 मिनिटांची बचत होणार आहे. कारण, हा प्रकल्प पूर्ण होताच सहा किलोमीटर च अंतर कमी होणार आहे.