महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरील येत्या 23 मार्चला होणारी सोमवती यात्रा कोरनामुळे रद्द करण्याचा निर्णय खंडोब देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला आहे. खंडोबाची यात्रा होणार की नाही याबाबत ग्रामस्थ,भाविकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण कोरोनासंदर्भात खबरदारीचा उपाय म्हणुन अखेर सोमवती यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यात्रेदरम्यान अमावस्या आली असल्याने सुर्यैदयानतंर दुस-या प्रहरात अमावस्येला प्रारंभ होत असल्याने पालखी निघणार नाही.