मुंबई - सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हा ऐतिहासिक असून सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या वादावर आता पडदा पडला आहे अशा स्पष्ट शब्दात पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी मांडली आहे अयोध्या प्रकरणाचा आज सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला आहे त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी आपलं मत आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे