मुंबई- भाजपाचे जेष्ट नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका सभेत मुस्लिम समाजाला संबोधित करताना, 'खुशाल गो-हत्या करा, मी असेपर्यंत कोणी तुम्हाला अडवणार नाही', असे विधान केले होते त्यावर आता प्रतिक्रीया येणे सुरू झाल्या आहेत ''कायदा तोडण्याचा सल्ला देत असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी'', अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे